पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राम मंदिर निकाल : शांतता राहिल असे पाहा, नरेंद्र मोदींचे मंत्र्यांना निर्देश

नरेंद्र मोदी

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणी सर्वोच्च न्यायालय येत्या काही दिवसांत निकाल देणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात सामाजिक सलोखा आणि शांततेचे वातावरण राहावे, यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिपरिषदेतील सर्व मंत्र्यांना केली आहे. न्यायालयाचा निर्णय जो काही येईल. त्याचा आदर राखला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

संजय राऊत म्हणतात, देवेंद्र फडणवीस यांच्याशी भांडण नाही पण...

रामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल १७ नोव्हेंबरपूर्वी लागणार हे स्पष्ट आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात निकालानंतर कोणताही हिंसाचार किंवा अप्रिय घटना घडू नयेत, यासाठी सर्व पातळ्यांवर काळजी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या संपूर्ण मंत्रिपरिषदेची बैठक घेतली. बुधवारी खूप वेळ ही बैठक चालली. या बैठकीमध्ये त्यांनी पुन्हा एकदा स्वच्छतेचा मुद्दा उचलून धरला. सरकारकडून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छेतासाठी मोठ्या प्रमाणात काम केले जात असताना अजूनही अस्वच्छता का दिसते आहे, असा प्रश्न त्यांनी संबंधित मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना विचारला.

'महाराष्ट्रासाठी आता एकच गोड बातमी, शिवसेनेचा मुख्यमंत्री'

राम मंदिरासंदर्भात मंत्र्यांनी कोणतेही वक्तव्य करणे टाळावे. गरज पडल्यास अत्यंत जबाबदारीने वक्तव्य करावीत, असेही नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या विविध निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा यावेळी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी नरेंद्र मोदींपुढे सादर केला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Peace and harmony should prevail PM Modi to council of ministers ahead of Ayodhya verdict