पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शांतता आणि बंधुभाव राखा, नरेंद्र मोदींचे दिल्लीकरांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिल्लीमध्ये गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दिल्लीतील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. दिल्लीतील नागरिकांनी शांतता आणि बंधुभाव राखला पाहिजे, असे नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दिल्लीतील स्थितीवरून काँग्रेसचा अमित शहांवर निशाणा, राजीनाम्याची मागणी

दिल्लीच्या ईशान्य भागात दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये आतापर्यंत २० जणांचा बळी गेला असून, शेकडो लोक जखमी झाले आहेत. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आणि समर्थनार्थ दोन गट एकमेकांना भिडले आणि दगडफेक झाली. यामुळे या भागातील परिस्थिती आजही तणावपूर्ण आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले असून, त्यात म्हटले आहे की, शांतता आणि सौहार्दपूर्ण संबंध हेच आमच्या विचारांच्या मूळाशी आहेत. दिल्लीतील सर्व बहिणींना आणि भावांना शांतता आणि बंधुभाव राखण्याचे मी आवाहन करतो. शांतता प्रस्थापित होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दिल्लीत लवकरात लवकर जनजीवन सुरळीत व्हायला हवे.

दरम्यान, दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र आणि दिल्ली सरकार हे दोन्हीही संयुक्तपणे जबाबदार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार असून, त्यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली.

दिल्लीत तातडीने लष्कर तैनात करा; केजरीवालांची गृहमंत्रालयाकडे मागणी

दरम्यान, दिल्लीतील सध्याच्या स्थितीवरून उच्च आणि सर्वोच्च न्यायालयानेही दिल्ली पोलिसांवर कडक ताशेरे ओढले आहेत. दिल्लीच्या ज्या भागात अशांतता आहे, तिथे कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे काम पोलिसांनी तातडीने करावे, जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यासाठी सुरक्षा पुरवावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.