पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Paytm कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, कंपनीचा 'वर्क फ्रॉम होम'चा निर्णय

कोरोना

जगभरात कहर माजवलेल्या कोरोना विषाणूने भारतामध्येही शिरकाव केलाय. बुधवारी गुडगावमधील लोकप्रिय डिजिटल पेमेंट अ‍ॅप पेटीएम कंपनीचा एक कर्मचारी कोराना बाधित असल्याची पुष्टी झाली. कंपनीने एका परिपत्रकाच्या माध्यमातून कर्मचाऱ्याची कोराना टेस्ट पॉजिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. या प्रकारानंतर कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दोन दिवसांची सुट्टी दिली असून त्यांना घरून काम करण्यास परवानगी दिली आहे.

प्रत्येक जिल्ह्यात कोरोना तपासणी केंद्र उभारा: PMO

 कंपनीनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कर्मचारी हा नुकताच इटलीहून सुट्टीचा आनंद घेऊन परतला होता. कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाल्यानंतर इतर कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती पेटीएम कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली. ते म्हणाले की, संबंधित व्यक्तीच्या  टीममधील सहकाऱ्यांना कोरोना चाचणी करण्याबाबत सांगण्यात आले आहे. या घटनेचा कामावर कोणताही प्रभाव पडणार नसुन काम सुरुच राहिल, अशी माहिती देखील त्यांनी दिली.  

कोरोनाबाबत सोशल मीडियावर चुकीचे संदेश पाठविणाऱ्यावंर गुन्हे

चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोनाने भारतात शिरकाव केला आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार बुधवारी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा हा २८ झाला होता. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार २८ कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये १६ जण हे इटलीचे पर्यटक आहेत.  

चीनच्या वुव्हानमधून जगभरात पसरलेल्या कोरोनाने आतापर्यंत ३ हजारहून अधिक लोकांचा जीव घेतला आहे. ९० हजारहून अधिक लोक कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. परदेशात १७ भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे. यात जपानच्या जहाजातील १६ भारतीय नागरिकांचा समावेश असून अमेरिकेत असलेल्या एका भारतीय नागरिकाला कोरोनाची लागण झाली आहे.