बिहारची राजधानी पाटणा येथील जन्मतः डोक्यापासून एकमेकांशी जोडले गेलेल्या जुळ्या बहिणींनीही मतदान केले आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही बहिणींना वेगवेगळ्या व्यक्ती मानून त्यांना मतदानाचा अधिकार प्रदान केला आहे.
सबाह आणि फराह (वय २३) या सयामी जुळ्या आहेत. त्या पाटणा शहरातील समनपुरा येथे राहतात. रविवारी या दोन्ही बहिणींनी मतदान केले. २०१५ मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी दोघांच्या नावाने एकच मतदान ओळखपत्र देण्यात आले होते. त्यामुळे दोघांचे एकच मत मानण्यात आले होते.
बंगालमध्ये टीएमसीकडून नरसंहाराची भाजपला भीती
Patna: Conjoined sisters Saba & Farah cast their votes as separate individuals with independent voting rights for the first time. #Bihar #LokSabhaElections2019
— ANI (@ANI) May 19, 2019
(Pictures courtesy- Election Commission) pic.twitter.com/t0ZFucfQiU
पाटणाचे जिल्हाधिकारी कुमार रवी म्हणाले की, सयामी जुळ्यांनी त्यांच्या शारीरिक स्थितीवरुन त्यांच्या वेगवेगळ्या ओळखीपासून त्यांना वंचित ठेवले जाऊ शकत नाही. त्यांचा मेंदू वेगळा आहे, त्यांचे विचार आणि आवडी वेगळ्या आहेत. त्यामुळे त्यांना नंतर वेगवेगळी ओळखपत्रे देण्यात आली आणि त्यांना मतदान करण्याची परवानगी देण्यात आली.
दोघांचे एकच मतदान मानण्यात आले होते. कारण मतदान हे गोपनीय असले पाहिजे. जेव्हा कोणी मतदान करत असेल तेव्हा तिथे कोणी उपस्थितीत नसावे. पण या दोघी अशा पद्धतीने जोडल्या गेल्या आहेत की त्या नेहमी विरुद्ध दिशेलाच असतात. त्यामुळे आम्हाला कोणतीही अडचण नव्हती. या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर शत्रुघ्न सिन्हा आणि भाजपचे नेते केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद हे निवडणूक लढवत आहेत.
निवडणूक आयोगाने नुकताच आपल्या टि्वटर हँडलवर निवडणुकीच्या गोष्टी असे शीर्षक देऊन या सयामी जुळ्या बहिणींबाबत माहिती दिली होती. दोघांवर शस्त्रक्रिया करुन वेगळे करण्याचा अनेकवेळा प्रयत्न करण्यात आला. पण डॉक्टरांनी अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असल्याचे सांगितले होते.