पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जीव मुठीत घेऊन हेल्मेट घालून कांदे विकण्याची वेळ

हेल्मेट घालून कांदे विकण्याची वेळ

कांद्याच्या गगनाला भीडलेल्या भावामुळे गृहिणी अस्वस्थ आहेत. कांद्यानं प्रतिकिलोमागे शंभरी पार केली आहे. कांद्याच्या चढ्या दरामुळे घरचं गणित कोलमडलं आहे. अशातच बिहारमध्ये सर्वसामान्यांसाठी कांदा ३५ रुपये किलो दरानं विकण्याचा निर्णय बिहार राज्य सहकारी विपणन संघानं (बिस्कोमॉन) घेतला आहे. 

नाशिकमधील २२ लाखांचे कांदे मध्यप्रदेशमध्ये चोरीला

स्वस्त दरात कांदे घेण्यासाठी बिस्कोमॉनच्या केंद्राबाहेर सर्वसामान्य गृहिणींच्या रांगा लागल्या आहेत. मात्र जनतेच्या रोषापासून वाचण्यासाठी केंद्रावरील विक्रेते घाबरून चक्क हेल्मेट घालून कांदे विकत आहेत. आमचा जीव धोक्यात आहे, लोक कांद्यांसाठी भांडत आहेत. साठा संपला की लोक अधिक आक्रमक होत आहेत, संतप्त नागरिकांकडून दगडफेकही करण्यात आली. आमचे जीव धोक्यात आहेत. इथे  आमच्या सुरक्षेसाठी कोणतीही पोलिस व्यवस्था नाही त्यामुळे स्वत:चा बचाव करण्यासाठी आम्ही हेल्मेट वापरत असल्याची माहिती एका  विक्रेत्यानं दिली. 

महिला डॉक्टरवर बलात्कार करून जाळले, ४ जण अटकेत