पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरण: दोषींच्या फाशीवरील सुनावणी पुढे ढकलली

निर्भया प्रकरणातील आरोपी

निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणावरील सुनावणी पतियाळा हाऊस उच्च न्यायालयाने तहकूब केली आहे. १८ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. दोषींना फाशीचे वॉरंट बजावण्याच्या मागणीसंदर्भात न्यायाधीशांनी सांगितले की, 'मला सर्वोच्च न्यायालयाकडून माहिती मिळाली आहे की अक्षयची पुनर्विचार याचिका मान्य करण्यात आली आहे आणि त्यावर १७ डिसेंबर रोजी सुनावणी होईल. त्यामुळे याप्रकरणाची सुनावणी पतियाला हाऊस न्यायालयाने पुढे ढकलली असून १८ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा: अनिल गोटे

निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी मागणी करत निर्भयाच्या आईने पतियाळा हाऊस न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. दरम्यान, सुरक्षिततेच्या कारणास्तव चारही दोषींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. 

आसाममधील निदर्शनांमुळे जपानच्या पंतप्रधानांचा भारत दौरा

याप्रकरणाच्या सुनावणी दरम्यान निर्भयाच्या वकिलांनी सांगितेल की, 'फाशी देण्याची तारीख निश्चित केली जावी. दया याचिकेचा डेथ वॉरंट जारी करण्याशी काही संबंध नाही. दया याचिकेसाठी अर्ज करण्यासाठी डेथ वॉरंट थांबवता येणार नाही.' पुढे त्यांनी असे देखील सांगितले की, जर सर्वोच्च न्यायालय पुनर्विचार याचिकेवर सुनावणी करणार असेल तर ते डेथ वॉरंटला स्थगित किंवा स्टे करु शकतात. बाकी तीन दोषींच्या पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. 

'पक्षाविरुध्द कारवाई केली तर गय केली जाणार नाही'

यावर पतियाळा हाऊस न्यायालयाच्या न्यायाधिशांनी सांगितले की, 'पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तोपर्यंत हे न्यायालय डेट वॉरंट बजावू शकत नाही. निर्भयाच्या वकिलाने यावेळी याकूब मेमन प्रकरणाचा संदर्भ दिला. यावर न्यायाधीश म्हणाले की, याकूब मेमन प्रकरणात कोणतीही पुनर्विचार याचिका प्रलंबित नव्हती.

संस्कृतमधून बोलल्यास मधुमेह, कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो - भाजप खासदार

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:patiala house court adjourned the hearing on plea of death warrant and execution of all convicts