पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अफगाणिस्तानमध्ये ११० प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले

अफगाणिस्तानमध्ये ११० प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले

अफगाणिस्तानमधील गजनी प्रांतात सोमवारी सरकारी हवाई कंपनी एरियाना अफगाण विमान कोसळले. स्थानिक वेळेनुसार दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत किती लोक दगावले याची माहिती अद्याप समजलेली नाही. 

गजनी प्रांताच्या गव्हर्नरचे प्रवक्ते आरिफ नुरी म्हणाले की, गजनी प्रांतातील देहयाक जिल्ह्यात दुपारी एक वाजून १० मिनिटांनी एका विमानाचा अपघात झाला. विमान कोसळल्यानंतर आग लागली होती. ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. हे विमान सैन्य दलाचे होते की व्यापारी याची माहिती अजून समजलेली नाही

जीवितहानीबाबत अद्याप काही स्पष्ट झालेले नाही. परंतु, दगावणाऱ्यांची संख्या मोठी असू शकते. स्थानिक माध्यमांनुसार या विमानात किमान ८० प्रवासी होते. तर काही माध्यमांनी १०० प्रवासी असल्याचे सांगितले. घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

डोंगराळ भाग असलेल्या देहयाक जिल्हा गजनी प्रांतात आहे. त्या ठिकाणीच विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या प्रांतातील काही भाग हा तालिबानच्या नियंत्रणाखाली आहे.