पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विरोधी बाकावर बसताच शिवसेना आक्रमक, पहिल्याच दिवशी संसदेबाहेर निदर्शने

शिवसेना खासदारांनी संसदेबाहेर निदर्शने केली. (photo by Mohd Zakir)

केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शिवसेना एनडीएचा घटकपक्ष राहिला नसल्याचे रविवारी जाहीर केले. शिवसेनेच्या संसदीय सदस्यांची विरोधी बाकावर बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली. आता विरोधी बाकावर बसलेल्या शिवसेनेने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आक्रमक धोरण स्वीकारले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांनी निदर्शने केली. 

सर्व विषयांवर चर्चेस तयार - नरेंद्र मोदी

शिवसेना खासदारांनी संसद परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्वरीत ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांचे कर्ज आणि वीज बिल वसुलीची सक्ती बंद करावी, शेतकऱ्यांना देण्यात येणारी नुकसान भरपाई वाढवून देण्याचे बॅनर घेऊन संसदेबाहेर घोषणा देत निदर्शने केली. 

शिवसेनेने पहिल्याच दिवशी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे अधिवेशनाचा उर्वरित काळ कसा राहिल याची चाहूल लागली आहे.

पुण्यात महापौरपदासाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी

दरम्यान, परंपरेप्रमाणे अधिवेशनाच्या सुरुवातीला संसद भवनामध्ये नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यसभेचे २५०वे सत्र सोमवारपासून सुरू होते आहे. आपल्या सगळ्यांसाठी हा महत्त्वाचा क्षण असल्याचे मोदी यांनी सांगितले. त्याचबरोबर हिवाळी अधिवेशनातच २६ नोव्हेंबरला ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यघटना दिन साजरा करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Parliaments winter session Shiv Sena leaders hold protest in Parliament premises demanding to declare unseasonal rains in Maharashtra as natural calamity