दिल्ली शहरातील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार गौतम गंभीर यांनी मंगळवारी लोकसभेत आपली भूमिका मांडली. शहरातील प्रदूषणाच्या मुद्यावर राजकारण करुन आपल्याला ही लढाई जिंकता येणार नाही, असे गंभीर यांनी म्हटले आहे. जनतेने आपल्या बहुमूल्य मत एकमेकांसोबत वाद-विवाद घालण्यासाठी नाही तर त्यांची कामे करण्यासाठी दिले आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा आपण खंबीरपणे त्यांचे प्रश्न सोडवायला हवेत, असे गंभीर यावेळी म्हणाले.
आपापसातील भांडणात दोघांचेही नुकसान, भागवतांचे सूचक वक्तव्य
आपल्या पूर्व दिल्ली मतदार संघाचा दाखला देत गंभीर यांनी प्रदूषणाला केवळ पराली जाळणाऱ्या शेतकऱ्यांना जबाबदार मानता येणार नाही, असेही म्हटले. माझ्या मतदार संघात आशियातील सर्वात मोठी कचरा डेपो आहे. केवळ शेतकऱ्यांना पराली जाळण्यापासून रोखल्याने प्रदूषणावर नियंत्रित करता येणार नाही. तर आपल्याला नव्या योजनेसह प्रदूषणाचा सामना करावा लागणार आहे.
सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भात केंद्राचा मोठा खुलासा
शहरातील प्रदूषणाचे गांभिर्य सांगताना गंभीर म्हणाले की, प्रदूषणामुळे प्रति तीन मिनिटाला एका मुलाला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे प्रदूषणाच्या मुद्यावर तात्पुरत्या स्वरुपात नाही दूरदृष्टिने उपाय योजना करायला हवी, असेही गंभीर यांनी म्हटले आहे.