पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उदयनराजेंना पराभूत करणारे श्रीनिवास पाटील यांनी घेतली शपथ

श्रीनिवास पाटील

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना पराभूत करणारे श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत सदस्यत्वाची शपथ घेतली. अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या पोटनिवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागली होती. उदयनराजेंनी राष्ट्रवादीचा त्याग करताना खासदारकीचाही राजीनामा दिला होता. अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत राष्ट्रवादीकडून शरद पवार यांचे जवळचे मित्र माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला होता. 

लोक येतील अन् जातील, पण ही व्यवस्था चालतच राहील : मोदी

संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारी सुरु झाले. पहिल्याच दिवशी श्रीनिवास पाटील यांनी इंग्रजीत शपथ घेतली. पहिल्याच दिवशी त्यांनी सातारा विषयक प्रश्न उपस्थित केला. 

राज्यसभेतील मार्शलचा नवा गणवेश पाहिला का?

देशात केंद्रीय विद्यालयांची सर्वांत कमी संख्या ही महाराष्ट्रात आहे. सातारा जिल्ह्यात अनेक आजी-माजी लष्करी अधिकारी आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना लष्करात जाण्याची इच्छा असते. त्यांच्यासाठी सातारा जिल्ह्यात कुठेही एक केंद्रीय विद्यालय सुरू करण्यात यावे, ही नम्र विनंती करतो असे त्यांनी म्हटले.

चिदंबरम यांच्या जामीन याचिकेवर आता सुप्रीम कोर्टात सुनावणी