पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ रुग्णालयात दाखल

अभिनेत्री तथा खासदार नुसरत जहाँ

तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नुसरत जहाँ यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

राष्ट्रवादीकडून थोडं शिका, मोदींनी राज्यसभेत केलं कौतुक

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, नुसरत जहाँ यांना कोलकाता येथील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नुसरत यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे १७ नोव्हेंबरला रात्री दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांना सोमवारपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनास उपस्थित राहता आले नाही.

बंगाली चित्रपट क्षेत्रातील सर्वांत सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या नुसरत जहाँ यांनी बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती. नुसरत यांनी इन्स्टाग्रामवर पती निखिल जैन बरोबर वाढदिवस साजरा करतानाचे फोटो शेअर केले आहेत. 

उदयनराजेंना पराभूत करणारे श्रीनिवास पाटील यांनी घेतली शपथ

कोलकाताचे उद्योगपती निखिल जैन बरोबर नुसरत जहाँ यांचा याचवर्षी १९ जून रोजी तुर्की येथे विवाह झाला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:parliament winter session Actor and TMC MP Nusrat Jahan is not attending the Parliament session today She was admitted due to some respiratory issue