पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संसदीय अधिवेशनाची तारीख ठरली! ५ जुलै रोजी सादर होणार अर्थसंकल्प

संसद भवन

सतराव्या लोकसभेच्या मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जून पासून ते २६ जुलै दरम्यान पार पडणार असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. १९ जुलै रोजी लोकसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. नव्या सरकारचा पहिल्या अर्थसंकल्प ५ जुलै रोजी  सादर केला जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. लोकसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. आठवेळा खासदार असलेल्या मेनका गांधी यांची लोकसभेच्या प्रभारी अध्यक्ष म्हणून वर्णी लागू शकते.  

अमित शहा देशाचे गृहमंत्री, निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थखाते

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्या उत्तर प्रदेशमधील सुल्तानपूर मतदार संघातून निवडून आल्या आहेत. मेनका गांधी यांनी पहिल्या मोदी सरकारच्या काळात महिला आणि बालविकास खात्याचा कारभार सांभाळला आहे. नव्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागलेली नाही.

मोदींच्या मंत्रिमंडळात महिला मंत्र्यांना महत्वाची जबाबदारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५९ मंत्र्यांना गुरुवारी (३० मे) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनियेतीची शपथ दिली. त्यानंतर शुक्रवारी (३१ मे) मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडे वेगवेगळ्या खात्याची जबाबदारी देण्यात आली. मंत्रिमंडळात समाविष्ठ नसणाऱ्या नवनिर्वाचित खासदारांना संसदीय अधिवेशनात शपथ दिली जाते.   

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Parliament session for budget to be held from 17th June to 26th July Election for Speaker will be on 19th June