पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सामर्थ्यवान विरोधी पक्ष लोकशाहीमध्ये महत्त्वाचा - नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी

लोकशाही व्यवस्थेमध्ये विरोधी पक्षांचे असणे आणि ते सामर्थ्यवान असणे अत्यंत महत्त्वाचे असते. विरोधकांचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. 

१७ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदीय लोकशाहीच्या संकेतांप्रमाणे संसदेच्या आवारात पंतप्रधानांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने दिलेला कौल महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

नरेंद्र मोदी म्हणाले, सबका साथ, सबका विकास हे ब्रीदवाक्य घेऊन गेल्यावेळी आम्ही सत्तेत आलो होतो. पण यावेळी देशवासियांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे. त्यामुळे या ब्रीदवाक्याला आता सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हे सुद्धा जोडले गेले आहे. सर्वसामान्यांचे स्वप्न साकार करण्याचे काम आमचे सरकार पुढील पाच वर्षांत करेल. १७ व्या लोकसभेमध्ये नवे सदस्य आल्यामुळे ते नवी ऊर्जा घेऊन आले आहेत. आम्हाला सर्वांना मिळून लोकांच्या अपेक्षापूर्तीसाठी काम करायचे आहे, असे त्यांनी सांगितले.

संसदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असले, तरी माझ्या मते सर्वांनी निष्पक्षपणे आपले काम केले पाहिजे, असे सांगून नरेंद्र मोदी म्हणाले, संसदेत सकारात्मक चर्चा व्हायला हवी. विरोधकांनीही सकारात्मकपणे कामकाजात सहभाग घेऊन आपले मुद्दे मांडले पाहिजेत. १७ व्या लोकसभेत नवे संकल्प घेऊन पुढे जाण्याला आपले प्राधान्य असेल, असे त्यांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Parliament Session 2019 Live Updates Proactive opposition key to democracy says PM Narendra Modi