पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीरमध्ये पंचायत निवडणूक जाहीर, ३७० हटविल्यानंतर पहिली निवडणूक

जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेले जवान

जम्मू-काश्मीरमधील प्रशासनाने तेथील पंचायत स्तरावरील रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्याचे निश्चित केले आहे. मतपत्रिकांच्या साह्याने हे मतदान घेण्यात येणार आहे. आठ टप्प्यांत मतदान होणार असल्याची माहिती जम्मू-काश्मिरचे मुख्य निवडणूक अधिकारी शैलेंद्र कुमार यांनी दिली. 

मॅच फिक्सिंगचा आरोपी संजीव चावलाचे इंग्लंडहून भारतात प्रत्यार्पण

जम्मू-काश्मिरचे गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये विभाजन करून दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले होते. जम्मू-काश्मीरमधून लडाख हा वेगळा केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आला. या घडामोडींनंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक पातळीवर निवडणूक होते आहे. 

जम्मू-काश्मिरचे नियंत्रण आता केंद्र सरकारकडून केले जाते. सरकारने या केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल म्हणून जी सी मुरमू यांची नियुक्ती केली आहे. जम्मू-काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी केंद्र सरकारने आपल्याकडेच ठेवली आहे.

औरंगाबादला जाण्यापूर्वी राज ठाकरे 'दगडूशेठ'च्या चरणी

मतपत्रिकांच्या साह्याने जम्मू-काश्मीरमध्ये पंतायतींच्या रिक्त जागांसाठी मतदान होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून काही राजकीय नेत्यांना सार्वजनिक सुरक्षितता कायद्यानुसार नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Panchayat polls to be held in J K using ballot boxes first political exercise since its special status was scrapped