पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'आसामचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पॅन कार्ड पुरेसे नाही'

'आसामचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पॅन कार्ड आणि बँकेचे दस्तावेज पुरेसे नाहीत'

नुकताच गुवाहाटी उच्च न्यायालयाने ट्रिब्यूनल ऑफ आसामकडून विदेशी घोषित केलेल्या एका महिलेची याचिका फेटाळली आहे. जमिनीचे कागदपत्रे, पॅन कार्ड आणि बँकेच्या कागदपत्रावरुन नागरिकत्व सिद्ध होत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. जबेदा बेगम यांच्या याचिकेवर न्या. मनोजित भुयान आणि न्या. पार्थिवज्योती साइकिया यांनी हे निर्देश दिले. वडील आणि भावाशी नाते सिद्ध करु न शकल्यामुळे ही याचिका फेटाळण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. 

पारनेरमध्ये जावयाने गोळ्या झाडून केला सासूचा खून

आसाममध्ये नागरिकत्व सिद्ध करणे कसे वेगळे आहे, हे न्यायालयाने आपल्या आदेशात सांगितले आहे. हे एकमेव असे राज्य आहे, जिथे १९५१ मध्ये एनआरसी तयार होती आणि मागील वर्षी ती अपडेट झाली. मागीलवर्षी ऑगस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीमध्ये पाच वर्षांच्या प्रक्रियेनंतर आसाममध्ये एनआरसी अपडेट करुन ती जाहीर करण्यात आली. यामध्ये ३.३ कोटी अर्जदारांपैकी १९ लाख अर्जदारांचे नाव बाहेर निघाले. आसाममध्ये नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी २४ मार्च १९७१ पूर्वीच्या १४ पैकी कोणताही असा दस्तावेज जमा करावा लागणार होता, ज्यात त्यांच्या पूर्वजांचे नाव असेल, ज्यावरुन त्यांचे नागरिकत्व सिद्ध होईल. 

शिवभोजन योजनेचा विस्तार, थाळीची संख्या दुप्पट

यामध्ये १९५१ एनआरसी, २४ मार्च १९७१ पर्यंतची मतदार यादी, भूमी आणि भाडेकरुची नोंद, नागरिकत्व प्रमाणपत्र, स्थायी निवास प्रमाणपत्र, शरणार्थी नोंदीकृत प्रमाणपत्र, विमा पॉलिसी, सरकारकडून जारी करण्यात आलेला वाहन परवाना किंवा बँक किंवा डाकघरचे खाते, जन्म प्रमाणपत्र, शिक्षण प्रमाणपत्र किंवा न्यायालयाच्या नोंदींचा दस्तावेजाचा समावेश आहे. 

जळगावमध्ये बिल्डरची गळफास घेऊन आत्महत्या

त्याचबरोबर दोन आणखी दस्तावेज अर्जदारांकडून जोडता येऊ शकतात. यामध्ये सर्कल अधिकारी किंवा ग्रामपंचायत सचिवाकडून विवाहानंतर पलायन करणाऱ्या महिलांना (२४ मार्च, १९७१ च्या आधी किंवा त्यानंतर) जारी करण्यात आलेले प्रमाणपत्र आणि २४ मार्च १९७१ पूर्वी जारी करण्यात आलेले रेशन कार्डचा समावेश आहे. पण हे दस्तावेज तेव्हाच मान्य होतील जेव्हा अर्जदारांकडे वरील सूचीबद्ध १४ दस्तावेजपैकी एक असावे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:PAN and bank documents are not enough to prove citizenship in Assam know the required documents