पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कपटी पाकने खोटेपणाचा कळस गाठलाय; भारताने फटकारले

भारत-पाकिस्तान तणाव कायम

काश्मीर मुद्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या बेताल वक्तव्यांचा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी खरपूस समाचार घेतला. पाकिस्तानने सामान्य शेजाऱ्यांप्रमाणे वागावे, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानचे कान टोचले. काश्मीर मुद्यावर पाकिस्तानकडून सुरु असलेल्या कुरापतीच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला चांगलेच सुनावले. 

कच्छमध्ये पाकिस्तानी कमांडोंची घुसखोरी; गुजरातमध्ये हाय अलर्ट

केंद्र सरकारने काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून पाकच्या पंतप्रधानांसह इतर मंत्र्यांकडून बेताल वक्तव्य करण्यात येत आहेत. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला अणु हल्ल्याची धमकी देखील दिली होती. यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार म्हणाले की, आम्ही भारताच्या अंतर्गत प्रकरणावर पाकिस्तान नेतृत्वाकडून करण्यात येणाऱ्या वक्तव्यांचा निषेध करतो. यावेळी त्यांनी पाकिस्तानचे मंत्री शिरीन मजारी यांनी संयुक्त राष्ट्राला काश्मीर मुद्यावरून लिहिलेल्या पत्रावर देखील भाष्य केले. पाकिस्तानच्या मंत्र्यांनी संयुक्त राष्ट्राला पाठवलेल्या पत्राला आम्ही अजिबात महत्त्व देत नाही, असेही ते म्हणाले.  

काश्मीर तुमचे कधी होते?, राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला टोला

काश्मीरच्या जनतेला समर्थन देण्याच्या बहाण्याने  पाकिस्तान देशात हिंसा पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. काश्मीर हा आमचा अंतर्गत मुद्दा असून त्यांनी यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. त्यांच्या क्षेपणास्त्र परीक्षणाची आम्हाला चांगलीच माहिती असल्याचे सांगत युद्धाची भाषा करणाऱ्या पाकिस्तानने आवाक्यात रहावे, असा सल्लाही  रवीश कुमार यांनी पाकला दिला आहे. आताही पाकिस्तान भारतात दहशतवादी पाठवण्याच्या तयारीत आहे. मात्र आम्ही त्यांना सांगू इच्छितो की, त्यांनी  कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला प्रोत्साहन देऊ नये. आश्रयाला असणाऱ्या दहशतवादी संघटनावर पाकने कारवाई करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.  

पाकिस्तानकडून अण्वस्त्र सज्ज गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी

काश्मीरमधील परिस्थितीबद्लल रवीश कुमार यांनी समाधान व्यक्त केले. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. राज्यात एकही गोळी झाडली गेली नाही. एकाही नागरिकाने आपला जीव गमावलेला नाही. काश्मीर खोऱ्यातील हळूहळू सकारात्मक बदल होत आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.