पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तानच्या कुरापती, कर्तारपूरच्या व्हिडिओमध्ये खलिस्तानी नेत्यांचे पोस्टर

पोस्टरचा काही भाग

पाकिस्तानचा कुरापती करण्याचा उद्योग अद्याप थांबलेला नाही. कर्तारपूर कॉरिडॉरच्या उदघाटनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तयार केलेल्या एका अधिकृत व्हिडिओमध्ये खलिस्तानी नेत्यांचे पोस्टर दाखविण्यात आले आहे. जर्नैल सिंग भिद्रनवाले, मेजर जनरल शेहबाग सिंग आणि आमरिक सिंग खालसा यांचा या पोस्टरमध्ये समावेश आहे. हे पोस्टर या व्हिडिओमध्ये वापरण्यात आल्याने हा व्हिडिओच वादग्रस्त ठरला आहे. 

अमानुषतेचा कळस, श्वानास गाडीला बांधून फरफटत नेले

अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात १९८४ मध्ये भारतीय लष्कराने केलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये हे तिन्ही खलिस्तान समर्थक उग्रवादी मारले गेले होते. त्यांच्याच पोस्टरचा व्हिडिओमध्ये वापर करून पाकिस्तानने कर्तारपूर कॉरिडॉरच्या कार्यक्रमाला काळ डाग लावल्याची भावना भारतीय समाजात निर्माण झाली आहे. 

'महा' चक्रीवादळाचा धोका; गुजरातमध्ये अलर्ट जारी

कर्तारपूरमधील दरबार साहिब गुरुद्वारा हे शीख बांधवांचे श्रद्धास्थान आहे. कर्तारपूरमधील हा गुरुद्वारा आणि पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक गुरुद्वारा यांना जोडण्यासाठी कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये यासाठी करारही करण्यात आला आहे.