पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाच्या जागतिक संकटातही सीमारेषेवर दहशतवाद्यांच्या 'नापाक' हालचाली

भारतीय लष्कर (संग्रहित छायाचित्र)

जगभरात कोरोना विषाणूने दहशत निर्माण केली आहे. पाकिस्तामध्येही याचा प्रादुर्भाव झालाय. या जागतिक संकटाच्या काळातही पाकने आपल्या दहशतवादाच्या कुरापती थांबण्याची मानसिकता बनवलेली दिसत नाही. भारतीय गुप्तचर संस्थाना मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधून काही दहशतवादी संघटना जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरीची तयारी करत आहेत. जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचे २३० दहशतवादी भारतामध्ये घुसखोरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.  

कोविड १९ BMC अन् आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या आकड्यांचा ताळेबंद जुळेना!

जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत १५८ कोरोनाग्रस्त आढळले असून याठिकाणी  ४  जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. सध्याच्या घडीला  राज्यातील पोलिस आणि सुरक्षेसाठी तैनात जवान लॉकडाउनच्या परिस्थितीत प्रशासनाला हातभार लावताना दिसत आहेत. याचा फायदा घेऊन दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. पाकिस्तानमध्येही कोरोना विषाणूने शिरकाव केलाय. याठिकाणी चार हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत ६३ जणांनी आपला जीव गमावला आहे. जागतिक संकट घोंगावत असताना पाकचे नापाक इरादे कायम असल्याचे दिसून आले आहे.

तबलिगींच्या मुद्यावरुन राज्याच्या गृहमंत्र्यांचा अमित शहांवर निशाणा

रविवारी कुपवाड परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली होती. यावेळी भारतीय लष्कराने पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत भारताचे पाच जवान शहिद झाले होते.  जम्मू काश्मीरचे पोलिस आयुक्त दिलबाग सिंह यांनी हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, एलईटी, जेईएम आणि एचएम दहशतवादी संघटनेचे १६० दहशतवादी काश्मीर खोऱ्यात घुसण्याच्या तयारीत आहेत. तसेच जम्मू सेक्टरमध्ये जवळपास ७० दहशतवादी आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर दबा धरुन बसले आहेत, अशी माहिती गुप्तचर संस्थांनी दिली आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Pakistani terror launch pads active to infiltrate 230 LeT JeM HM terrorists Jammu Kashmir LoC IB border coronavirus lockdown