पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तानी लष्कराचे विमान कोसळले, १७ जणांचा मृत्यू

रावळपिंडीत पाकिस्तानी लष्कराचे एक विमान निवासी परिसरात कोसळले.  (AP)

पाकिस्तानमधील रावळपिंडी शहरात मंगळवारी पहाटे पाकिस्तानी लष्कराचे एक विमान निवासी परिसरात कोसळले. या अपघातात आतापर्यंत किमान १७ जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तास दुजोरा मिळालेला आहे. या दुर्घटनेत १२ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते. काही जखमींची स्थिती गंभीर आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये ५ सैनिकांचाही समावेश आहे. 

या दुर्घटनेत विमानाच्या दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाल्याचे पाकिस्तानी लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. घटनेचे गांभीर्य पाहून रावळपिंडीमधील रुग्णालयांमध्ये आपत्कालीन स्थिती घोषित करण्यात आली आहे. बचाव पथकाच्या सदस्यांनी या दुर्घटनेत किमान १२ लोक जखमी झाले असून यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले.

US वरुन ४ अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर भारतात, हवाई दलाची ताकद वाढणार

पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडीमध्ये झालेल्या या दुर्घटनेनंतर बचावकार्याला वेग आला आहे. दुसरीकडे, लष्करानेही अद्याप अपघाताचे कारण सांगितलेले नाही. या विमानाने प्रशिक्षणासाठी उड्डाण घेतले होते, असे लष्कराने म्हटले आहे. दरम्यान, हे विमान रावळपिंडीच्या बाहेरील परिसर असलेल्या मोरा कालू गावात कोसळले आहे.

वृत्त वाहिनींच्या व्हिडिओ फुटेजमध्ये विमान निवासी क्षेत्रात कोसळल्यानंतर आग लागली होती. यामध्ये अनेक घर उद्धवस्त झाल्याचे सांगण्यात येते. वैमानिकांचे विमानावरील नियंत्रण अचानक सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे बचाव पथकातील एकाने सांगितले. अंधार असल्याने बचाव कार्यात अ़़डथळे येत होता.

मुंबई विमानतळावर 'ध' चा 'मा', 'बॉम्बे' म्हटल्याचे ऐकले 'बॉम्ब है'