पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीर प्रकरणी पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तान वेगवेगळ्या पध्दतीने भारताच्या या निर्णयाचा निषेध करत आहे. काश्मीरचा मुद्दा पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघात मांडला. मात्र त्याठिकाणी पाकिस्तानला निराशाच मिळाली. तरी देखील पाकिस्तान आपल्या अडमुठेपणावर कायम आहे. आता पाकिस्तानने काश्मीर प्रकरणी हेग स्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.

INX मीडिया प्रकरण: सीबीआयनंतर ईडीचे पथक चिदंबरम यांच्या घरी दाखल

पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सांगितले की, 'आम्ही काश्मीर प्रकरणी हेग स्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व कायदेशीर बाबींचा विचार करूनच आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचा निर्णय आम्ही घेतला', असल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानमधील एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही माहिती दिली. 

गुलाम नबी आझाद यांना पुन्हा रोखले; जम्मूवरुन दिल्लीला परत पाठवले

दरम्यान, जम्मू-काश्मीर प्रकरणी पाकिस्तानने सतत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. हा मुद्दा पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघात मांडला. मात्र चीन सोडून जगातील इतर देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही. तर मुस्लिम देशांकडून देखील पाकिस्तानला निराशा मिळाली. त्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने आता या प्रकरणी आंतराराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. 

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 'अमृत' संस्थेची स्थापना होणार

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Pakistani government has decided to approach the International Court of Justice over Kashmir issue