पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कच्छमध्ये पाकिस्तानी कमांडोंची घुसखोरी; गुजरातमध्ये हाय अलर्ट

प्रातिनिधिक छायाचित्र

गुजरातच्या कच्छ भागामध्ये पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन आलेले दहशतवादी घुसल्याची शक्यता गुप्तचर विभागाने दिल्यामुळे या भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. बीएसएफ आणि भारतीय तटरक्षक दलासह अन्य सुरक्षा यंत्रणांनाही हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाकिस्तानचे दहशतवादी कच्छमध्ये घुसले असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली. पाण्याच्या खालून हे दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरील सर्व ठिकाणी हाय अलर्ट देण्यात आला आहे.

सोलापूरमध्ये वडवळ पुलावरुन ट्रक कोसळला; रेल्वेसेवा विस्कळीत

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या कच्छ भागामध्ये पाकिस्तानचे कमांडो आणि दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली. हे दहशतवादी समुद्रातील जहाजांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे. गुप्तचर विभागाच्या माहितीनंतर कांडला बंदरावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. त्याचसोबत गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर हाय अलर्ट देण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तटरक्षक दलाकडून समुद्रामध्ये गस्त वाढविण्यात आली आहे. 

पाकिस्तानकडून अण्वस्त्र सज्ज गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी

गुप्तचर विभागाच्या माहितीनंतर कोस्ट गार्ड, पोर्ट प्राधिकरण, कस्टम, कोस्टल पोलिस, नेव्हीला अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, जम्मू- काश्मिरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम - ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तान संतापला आहे. वेगवेगळ्या पध्दतीने पाकिस्तान या निर्णयाला विरोध करत आहे. 

भारताचा प्रत्येक नागरिक फिट रहायला हवा: मोदी