पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार; दोन जवान शहीद

भारतीय जवान

जम्मू-काश्मीरच्या सीमा भागात पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहे. पुँछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार आणि मोर्टार हल्ला करण्यात आला. यामध्ये लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत तर दोन जण गंभीर जखमी झालेत.

चंदा कोचर यांच्याविरोधात ईडीची मोठी कारवाई; ७८ कोटींची संपत्ती जप्त

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ११ वाजता पाकिस्तानने पुंछ जिल्ह्यातील गुलपुर सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार केला. पाकिस्तानी सैनिकांनी भारताच्या दिशेने मोर्टार हल्ला देखील केला. यामध्ये लष्कराच्या दोन जवानांचा मृत्यू झाला तर दोन जवान जखमी झाले आहेत. 

मोदी सरकारने JNU बंद करावे, भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींचा

पाकिस्तानने गोळीबार केला तेव्हा हे जवान गुलपूर सेक्टर परिसरात काम करत होते. जखमी झालेल्या जवानांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. भारतीय जवान पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहेत. 

जळगावः महाजन-दानवेंसमोरच भाजप कार्यकर्त्यांचा राडा