पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तानची सटकली; समझौता एक्स्प्रेस सेवा बंद

समझौता एक्स्प्रेस

जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. एएनआय या वृत्त संस्थेन दिलेल्या माहितीनुसार, कलम 370 रद्द केल्यामुळे चिडचिड झालेल्या पाकिस्तानने गुरुवारी समझौता एक्स्प्रेसची सेवा बंद केली आहे.

आलमट्टीतून पाच लाख क्युसेक्सने विसर्ग, सांगलीतील पूर कमी होणार

याआधी 370 कलम रद्द करुन जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्र शासित प्रदेश तयार करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचा पाकिस्तानने विरोध केला. या निर्णयामुळे पाकिस्तान संतापला असून पाकिस्तानने भारतासोबतचे राजकीय आणि व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने भारताच्या राजदुताला काढून टाकण्याचा निर्णय घेतला असून पाकिस्तानच्या भारतीय उच्चायुक्ताला परत जाण्यास सांगितले होते. 

सांगलीतील ब्रह्मनाळ येथे बोट उलटली; १२ जणांचा मृत्यू

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितले की, आम्ही आमच्या राजदुताला दिल्लीवरुन परत बोलवणार आहोत आणि भारताच्या राजदुताला परत पाठणार आहोत. तर, पाकिस्तान आणि भारतामध्ये राजकीय संबंधांमध्ये असलेल्या कटुतेमुळे पाकिस्तान आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्याबरोबर द्विपक्षीय व्यापारास प्रतिबंध लावणार असल्याचे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. 

साताऱ्यात पावसाचा जोर ओसरला; पूरस्थिती कायम

दरम्यान, सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या कलम ३७० मधील काही तरतुदी रद्द केल्या. लोकसभा आणि राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील या विधेयकाला मंजूरी दिली. त्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश तयार झाले आहेत. 

आता शाळेची फी सुद्धा या अ‍ॅपच्या साह्याने भरू शकणार