पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिवाळीपूर्वी पाकिस्तानला झटका, भारताने बंद केली 'ही' सेवा

दिवाळीपूर्वी पाकिस्तानला झटका, भारताने बंद केली 'ही' सेवा

उत्तर प्रदेशमधील आग्रा येथून भारतीय डाक (पार्सल) आता पाकिस्तानला जाणार नाही. पोस्ट विभागाने पाकिस्तानचे बुकिंग बंद केले आहे. पोस्ट विभागाचे पोस्ट मास्टर जनरल अंबेश उपमन्यू यांनी सर्व कार्यालयांना हा संदेश पाठवला आहे. आता पाकिस्तानला एकही डाक जाणार नाही. 

विभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी २३ ऑगस्टला पाकिस्तानने भारतातून जाणारे डाक बंद केले. त्याचबरोबर भारतातून येणारे डाकही स्वीकरणे त्यांनी बंद केले. याची माहिती भारताला देण्यात आली नाही. डाक विभागाची बुकिंग परत येऊ लागल्यानंतर स्थानिक कार्यालयांनी डाक भवन, दिल्लीला माहिती दिली. तेव्हा पाकिस्तानने भारताचे डाक बुकिंग बंद केल्याचे समजले.

गडचिरोलीत निवडणूक कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाचा मृत्यू

दिल्लीतील डाक भवनमधून १८ ऑक्टोबरला याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले. यामध्ये पाकिस्तानला जाणारे डाक बुकिंग तात्काळ प्रभावाने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. आग्रा विभागात हा संदेश मिळाल्यानंतर याची त्वरीत अंमलबजावणी करण्यात आली.

पाकिस्तानमधील सुमारे डझनभर मुलींचे आग्रा येथील मुलांबरोबर लग्नं झालेली आहेत. प्रत्येक सण-उत्सवावेळी नातेवाईकांना पोस्टाच्या माध्यमातून वस्तू पाठवल्या जातात. पण आता त्यांच्यासमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत.

बोगस मतदारांवरुन बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्यात जुंपली

दिवाळीत सर्वाधिक बुकिंग 
डाक विभागाचे सहायक निर्देशक यूपी सिंह सेंगर यांनी दिवाळीच्या काळात सुमारे २० पार्सल पाकिस्तानला पाठवण्यात येते. दिवाळीच्या काळात सर्वाधिक बुकिंग केले जाते. पण आता हे बुकिंग होणार नाही.