पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीर भारताचेच! जिनेव्हात पाक परराष्ट्रमंत्र्यांचे वक्तव्य

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री

जिनेव्हामधील संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेमध्ये (UNHRC) पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. विशेष म्हणजे यावेळी पाकिस्तानने काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असल्याचे अप्रत्यक्षरित्या मान्य केले. जम्मू काश्मीर भारतातील राज्य आहे, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शहा महमूद यांनी संयुक्त राष्ट्राच्या परिषदेनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले. 

भारत-पाकदरम्यान तणाव घटला, मदतीसाठी मी तयारः डोनाल्ड ट्रम्प

भारतीय केंद्र सरकारने काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानकडून भारतावर अनेक आरोप केले. प्रत्येकवेळी त्यांच्या पदरी निराशाच आली. त्यानंतर आता पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांनीच काश्मीर भारताचा अविभाज्य घटक असल्याचा उल्लेख केला आहे. यासंदर्भातील त्यांचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. 

सुरक्षादलांना मोठे यश; 'लष्कर' मॉड्यूल उद्ध्वस्त, ८ दहशतवाद्यांना अटक

काश्मीरच्या मुद्यावर प्रतिक्रिया देताना शहा महमूद कुरैशी म्हणाले की, काश्मीरमध्ये सर्व सामान्य असल्याचे चित्र भारत जगासमोर उभा करत आहे. जर असे असेल तर भारतातील जम्मू काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे आणि मानवाधिकारी संस्थांना जाण्यापासून का रोखले जात आहे?  संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHRC) पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत पुन्हा एकदा भारतावर बिनबुडाचे आरोप केले. काश्मीरमध्ये  संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावाचे उल्लंघन करण्यात येत आहे. परिषदेने मानवाधिकाराच्या उल्लंघनाच्या घटनेवर लक्ष द्यावे. यासाठी संयुक्त चौकशी समिती नेमण्याची मागणी देखील पाकिस्तानकडून करण्यात आली.