पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सार्कच्या खास बैठकीत पाकने उपस्थित केला जम्मू-काश्मीरचा मुद्दा

पाकिस्तानने उपस्थितीत केला काश्मीरचा मुद्दा

कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करण्यासाठी बोलवलेल्या सार्कच्या खास बैठकीत पाकिस्तानने जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावानंतर सार्क (आशिया खंडामधील ८ देशांची एक आर्थिक व राजकीय सहयोग संघटना) सदस्यांच्या नेत्यांची बैठक पार पडली. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडलेल्या या बैठकीत पाक सरकारच्या आरोग्य विभागाचे विशेष सहाय्यक जफर मिर्जा सहभागी झाले होते. कोरोनाचे संकटाला लढा देण्यासाठी जम्मू काश्मिरमधील निर्बंध हटवण्याची मागणी त्यांनी केलीय. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर SAARC मधील राष्ट्रांना मोदींनी दिला मंत्र

चीनच्या वुव्हानमध्ये निर्माण झालेल्या कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. १३५ पेक्षा अधिक देशात आतापर्यंत कोरोनामुळे ५ हजारहून अधिक जणांनी जीव गमावला आहे.  १ लाख ५० हजारहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. एकट्या चीनमध्ये ८० हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली असून ३ हून अधिक लोकांना यामुळे जीव गमावला आहे. 

राज्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त, मोदी- ठाकरे यांच्यात फोनवरुन चर्चा

पाकिस्तानमध्ये कोरोनाचे ३४ रुग्ण आढळले असून भारतात पाकपेक्षाही अधिक रुग्ण आढळले आहेत. अफगानिस्तानमध्ये ११, श्रीलंकेत १०, मालदीव, बांगलादेश, नेपाळ आणि भूटान या देशांत प्रत्येकी एक-एक रुग्ण आढळला आहे. पाकने जम्मू  काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतर्कतेवर भर देणेच पंसत केले. घाबरून न जाता आपण या साथीच्या रोगावर नियंत्रण मिळवायला हवे, असे मोदींनी सांगितले. पाकिस्तानशिवाय या बैठकीत श्रीलंकाचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे, मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह, नेपाळचे पंतप्रधानके पी शर्मा ओली, भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, अफगानिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी सहभागी झाले होते.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Pakistan raises Kashmir during SAARC video conference restrictions should be lifted in Jammu Kashmir to deal with coronavirus threat