पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: मोदींचे नाव घेताच पाकिस्तानच्या मंत्र्याला बसला शॉक

पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद

भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धाची घोषणा करणारे पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांना विजेचा जोराचा झटका बसला. ज्यावेळी त्यांना विजेचा धक्का बसला त्यावेळी ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत होते. विजेचा धक्का बसताच शेख रशीद घाबरले आणि त्यांनी आपले भाषणच थांबवले. नंतर विजेच्या धक्क्यातून सावरत त्यांनी मोदी त्यांच्या मोर्चांना अयशस्वी ठरवू शकत नाहीत, असे म्हटले.

रशीद म्हणाले की, नरेंद्र मोदींनी काश्मीरमध्ये आपली सर्वांत मोठी चूक केली आहे. भारताने दोन मोठ्या चुका केल्या आहेत. पहिली चूक, त्यांनी ५ अणूस्फोट घडवले. आम्ही ६ स्फोट करुन त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. आता काश्मीरमध्ये त्यांनी दुसरी सर्वांत मोठी चूक केली आहे. रशीद भाषण देतच होते आणि त्याचवेळी त्यांना विजेचा धक्का बसला. यावेळी ते थोडे घाबरले पण लगेच स्वतःला सावरत 'जबरदस्त शॉक बसला' अशी टिप्पणीही केली.

मी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी तरुणी सापडली

तत्पूर्वी, त्यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हटले की, भारताला २२ तुकड्यात विभागल्यास त्यांचे आधिपत्याचा अंत होईल. दरम्यान, वारंवार अणू युद्धाची धमकी देणारे पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी काही दिवसांपूर्वी युद्धाचा घोषणा केली होती.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Pakistan Rail Minister Sheikh Rashid gets electricity shock while speaking against PM narendra Modi