पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदी-ट्रम्प मित्रत्व पाहूनही इम्रान यांना शत्रुत्वापलिकडे काही सुचेना!

मोदी-ट्रम्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांच्यातील तीन दिवसांतील मित्रत्वाच्या चर्चेनंतर आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पुन्हा एकदा भारताविरुद्ध युद्ध छेडण्याची भाषा केली आहे. ट्रम्प यांनी मोदींना अमेरिकी रॉक स्टार एल्विस प्रेस्लेप्रमाणे लोकप्रिय असल्याचे कौतुक केले. याशिवाय त्यांनी भारत-पाक यांच्यातील मतभेद आपापसातील चर्चेने सोडवण्याचा सल्ला दिला आहे. 

काश्मिरच्या मुद्दयावर कोणीच साथ देत नसल्याने इम्रान खान निराश

वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा हटवण्याच्या मुद्यावरुन ५ ऑगस्टपासून भारत-पाकिस्तान यांच्यात तणावपूर्ण वातावरण आहे. काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात लोकांना तुरुंगात डागल्याचे आणि  रुग्णालयातील सेवा ठप्प असल्याचा दाखला देत मागील ५० दिवसांपासून काश्मीरची जनता ९ सैनिकांच्या कैदेत असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

ट्रम्प म्हणाले, मोदी हे 'फादर ऑफ इंडिया'

पाकिस्तानी पंतप्रधान म्हणाले की, काश्मीर खोऱ्यात ८० लाख लोक खुल्या तुरुंगात आहेत. सध्याच्या घडीला हा सर्व प्रकार अभूतपूर्व असा आहे. कर्फ्यू हटवल्यानंतर येथील परिस्थिती काय असेल? याची चिंता वाटते, असेही ते म्हणाले.  
ते पुढे म्हणाले, दोन्ही राष्ट्रांमधील सध्याची परिस्थितीही युद्धाचे संकेत देणारी आहे. एका बाजूला इम्रान खान जम्मू काश्मीरच्या मुद्यावरुन भारतावर पुन्हा एकदा आरोप करत असताना दुसऱ्या बाजूला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प याच्यांती मित्रत्वाची झलक पाहायला मिळाली. मोदींसोबतच्या बैठकीनंतर ट्रम्प यांनी त्यांची तुलना दिवंगत अमेरिकी गायक प्रेस्ले यांच्यासोबत केली.