पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तोंडघशी पडूनही पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात विजय आमचाच

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बुधवारी कुलभूषण जाधव प्रकरणात भारताची बाजूने निकाल दिला. या प्रकरणात पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याचे सांगत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेसंदर्भात फेरविचार करण्याचे आदेशही दिले. कुलभूषण जाधव प्रकरणात तोंडघशी पडलेले पाकिस्तान आपण जिंकल्याच्या वार्ता करत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी याप्रकरणावर असे म्हटले आहे की, इस्लामाबादचा विजय झाला आहे. याप्रकरणात पाकिस्तान कायद्यानुसार काम करेल.

'काँग्रेसमुक्त महाराष्ट्र'लाच प्राधान्य - चंद्रकांत पाटील

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर दुसऱ्या दिवशी इम्रान खान यांनी ट्विट केले की, 'आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. त्यांनी कमांडर कुलभूषण जाधव यांची सुटका आणि त्यांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला नाही. तो पाकिस्तानच्या लोकांवर गुन्हेगारीचा दोष असल्यासारखे आहे. पाकिस्तान कायद्यानुसार पुढे कारवाई करेल.'

कर्नाटकमधील एका आमदाराचा राजीनामा मागे, आता पुढे काय...

दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक वर्षापासून वादाचा विषय असलेल्या कुलभूषण जाधव प्रकरणामध्ये आंतरराषट्रीय न्यायालयाने बुधवारी भारताच्या बाजूने निकाल दिला. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती कायम ठेवत त्यांना या शिक्षेवर फेरविचार करण्याचे आदेश दिले आहेत. 

हाफीज सईदच्या अटकेवर ट्रम्प यांचे ट्विट; दोन वर्षाचा दबाव कामी 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:pakistan pm imran khan appreciate the decision of international court in kulbhushan jadhav case