पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवादाबाबत अमेरिकेमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे. पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआय यांनी अल कायदा या दहशतवादी संघटनेला प्रशिक्षण दिले असल्याचे इम्रान खान यांनी अखेर कबूल केले आहे. अमेरिकेत परराष्ट्र संबंध परिषदेमध्ये इम्रान खान सहभागी झाले होते. त्यावेळी परिषदेचे अध्यक्ष रिचर्ड एन हास यांनी इम्रान खान यांनी मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी दहशतवादाबाबत हा खुलास केला आहे.
दोन्ही देशांची तयारी असेल तर काश्मीर प्रश्नी मध्यस्थीसाठी तयार - ट्रम्
इम्रान खान यांनी सांगितले की, 'पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयने अल कायदा आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांना अफगाणिस्तानात लढण्यासाठी प्रशिक्षण दिले होते. तसंच, पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयचे अल कायदा या दहशतवादी संघटनेशी चांगले संबंध आहे. हे कडू सत्य आहे की, पाकिस्तान हे नेहमी लपवत आले आहे. मात्र हे भयानक षडयंत्र आता संपूर्ण जगासमोर आले आहे.' असा कबुलनामा इम्रान खान यांनी अमेरिकेमध्ये केला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे आज युतीची घोषणा करणार ?
इम्रान खान यांना विचारण्यात आले होते की, अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला ऐबटाबादमध्ये यूएस नेवी सील्सच्या जवानांकडून मारण्यात आले. या घटनेची पाकिस्तान सरकारने चौकशी का केली नाही? यावर त्यांनी सांगितले की, ' आम्ही या घटनेची चौकशी केली. आयएसआयने ९/११ हल्ल्याआधी अल कायदाला प्रशिक्षण दिले होते. त्याचे धागेदोरे आमच्याशई जोडले गेले. तसंच, मला जेवढे माहित आहे त्यानुसार पाकिस्तानी लष्कर प्रमुख आणि आयएसआयला ऐबटाबादबद्दल काहीच माहिती नाही. जर कोणाला माहित असेल तर ते कदाचित खालच्या पातळीवर असेल.' असे देखील इम्रान खान यांनी सांगितले.