पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एक दिवस पीओके भारताचा हिस्सा असेल, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे मोठे वक्तव्य

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाक व्याप्त काश्मीर (पीओके) भारताचा हिस्सा असल्याचे मोठे वक्तव्य केले आहे. पीओके एक दिवस भारताचा हिस्सा असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जोपर्यंत शेजारी देश दहशतवादाला प्रोत्साहन देणे थांबवत नाही. तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

मोदी २.० ला १०० दिवस झाल्यानिमित्त परराष्ट्र मंत्रालयाच्या कामगिरीची माहिती देताना जयशंकर यांनी पाकिस्तान एक 'यूनिक चॅलेंज' असल्याचे म्हटले. आम्हाला एका शेजारी देशाकडून आव्हान मिळत आहे, असे ते म्हणाले.

जागतिक मंचावर भारताच्या आवाजाला आता पूर्वीपेक्षा जास्त महत्व: एस जयशंकर

पाकिस्तानबरोबर आमचा एकच मुद्दा आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत आहे. ते आपल्या नितीमध्ये बदल करताना दिसत नाहीत. ते खुलेआम आपल्या देशात शेजारी देशाविरोधात दहशतवादाला प्रोत्साहन देत आहेत. जोपर्यंत ते दहशतवाद संपवत नाहीत. तोपर्यंत त्यांच्याशी कोणतीच चर्चा होणार नाही.

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवणे हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचे सांगत ते म्हणाले की, पीओके भारताचा हिस्सा आहे आणि तो भारताचा हिस्सा होणार याचा आम्हाला विश्वास आहे.

पाकिस्तानात कैदेत असलेले भारतीय नागरिक कुलभुषण जाधव यांच्याबाबत त्यांनी म्हटले की, आमचा उद्देश हा जाधव यांची स्थिती जाणण्याचा होता. जाधव यांना भेटण्याचा हेतू हा त्यांचा अधिकार मिळवण्यासाठी होता. आम्ही एका निर्दोष व्यक्तीला देशात पुन्हा आणण्याचा प्रयत्न करत आहोत.