पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कलम 370 रद्द केल्यामुळे पाकिस्तानची चिडचिड

इम्रान खान

जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा म्हणजे कलम 370 रद्द करत सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला. अनेक राजकीय पक्ष या निर्णयाचे स्वागत करत आहेत. तर काही पक्षांनी याचा विरोध केला आहे. तर दुसरीकडे, पाकिस्तानने भारताच्या या निर्णयाला विरोध केला आहे. भारत सरकारचा कोणताही एकतर्फी निर्णय जम्मू-काश्मीरची स्थिती बदलू शकत नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

काँग्रेसला आणखी एक धक्का, मुख्य प्रतोदांचा राजीनामा

कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने याचा विरोध केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने असे म्हटले आहे की, 'जम्मू-काश्मीर आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त विवादित प्रदेश आहे. भारत सरकार या विवादित राज्याबाबत एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) प्रस्ताव ठेवला पाहिजे. हा निर्णय जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तान कधीही स्विकारणार नाही.'

जम्मू-काश्मीरचे कलम ३७० हटविण्याचा निर्णय साहसी - संघ

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी जम्मू-काश्मीर सरकारशी संबंधित संविधान (जम्मू काश्मीरमध्ये लागू) आदेश २०१९ लागू केला आहे. ज्यामध्ये जम्मू-काश्मीरमध्ये भारताचे संविधान लागू करण्याची तरतूद आहे. या संविधानाची तात्काळ प्रभावाने अंमलबजावणी सुरु झाली आहे. हा जम्मू-काश्मीर मध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या १९५४ च्या आदेशाची जागा घेईल. राष्ट्रपतींनी संविधानाच्या कलम ३६७ मधील उपकलम ४ शी जोडला आहे. यामध्ये चार बदल करण्यात आले आहेत, असे सरकारने म्हटले आहे. 

राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी नवाब मलिक यांची वर्णी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:pakistan ministry of foreign affairs big statement on the end of article 370 from jammu and kashmir