पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इम्रान खान भारतासाठी हवाई हद्द बंद करण्याच्या विचारात

इम्रान खान

केंद्र सरकारने जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा बहाल करणारे कलम ३७० रद्द केल्यामुळे बिथरलेल्या पाकने आता भारतासाठी हवाई हद्द बंद करण्याचा विचार सुरु केला आहे.  फ्रान्समधील जी ७ परिषदेत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मोदींनी काश्मीर हा भारत-पाक यांच्यातील द्विपक्षीय मुद्दा असल्याचे सांगितले. त्यानंतर इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या जनतेला संबोधित करताना भारताला अणु हल्ल्याची धमकी दिली.

जम्मू-काश्मीरः अपहरण करुन दहशतवाद्यांनी केली एकाची हत्या

त्यानंतर आता पाकिस्तान सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी ट्विटच्या माध्यमातून पाक पंतप्रधान इम्रान खान भारतासाठी पाकिस्तानची हवाई हद्द पूर्णपणे बंद करण्याच्या विचार करत असल्याचे म्हटले आहे. यासोबतच अफगाणिस्तान आणि भारतादरम्यानचा व्यापारासाठी वापरला जाणारा मार्गही बंद करण्याची सूचना पाक कॅबिनेटच्या बैठकीत सूचवण्यात आली आहे. एएनआयने फवाद खान यांच्या ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. 

पूर्व कमांड लष्कर प्रमुख म्हणाले, आता चीनची दादागिरी चालणार नाही

यासंदर्भात पाकिस्तान कायदेशीर औपचारिकता पूर्ण करत असल्याचे वृत्त आहे. यापूर्वी भारताने बालाकोटमध्ये केलेल्या सर्जिकल स्टाइकनंतर पाकिस्तानकडून भारतासाठी हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याचा पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे हा निर्णय घेताना पाकिस्तानला शंभरवेळा विचार करावा लागेल. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Pakistan Minister Fawad Chaudhry tweets Pakistan Prime Minister Imran Khan is considering complete closure of air space to India