पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तानकडून कर्तारपूर कॉरिडॉरच्या उदघाटनासाठी मनमोहन सिंग यांना निमंत्रण

डॉ. मनमोहन सिंग

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या कर्तारपूर कॉरिडॉरच्या उदघाटनासाठी पाकिस्तानने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना निमंत्रित केले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांच्याकडून हे निमंत्रण देण्यात आले असून, लवकरच पाकिस्तान सरकारकडून औपचारिक निमंत्रण पाठविण्यात येईल.

अजितदादांविरोधात मुख्यमंत्री ढाण्या वाघाला मैदानात उतरवणार

शाह मेहमूद कुरेशी यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून हे निमंत्रण दिले आहे. त्याचबरोबर लवकरच औपचारिक निमंत्रण सरकारकडून पाठविण्यात येईल, असे म्हटले आहे. आपल्या संदेशामध्ये कुरेशी यांनी म्हटले आहे की, डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे भारतात खूप आदरपूर्वक बघितले जाते आणि ते शीख समुदायातून येतात.

मनसे निवडणुकीच्या रिंगणात; ५ ऑक्टोबरला राज ठाकरेंची पहिली प्रचारसभा

पाकिस्तानातील कर्तारपूरमधील दरबार साहिब ते पंजाबमधील गुरदास जिल्ह्यातील डेरा बाबा नानक या श्रद्धास्थानांना या कॉरिडॉरच्या माध्यमातून जोडले जाणार आहे. दरबार साहिबला जाणारे भाविक व्हिसाशिवाय केवळ परवान्याच्या माध्यमातून कर्तारपूरमध्ये जाऊ शकणार आहेत. गुरु नानक यांच्या ५५० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर येत्या नोव्हेंबरमध्ये हा कॉरिडॉर सुरू होणार आहे.