पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

१३ अ‍ॅक्शन प्लॅनसंदर्भात एफएटीएफकडून पाकला 'अल्टिमेटम'

पाकला दणका, ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यात अपयश

फायनाशियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) पाकिस्तानला 'ग्रे लिस्ट'मध्ये कायम ठेवले आहे. एफएटीएफच्या इंटरनॅशनल को-ऑपरेशन रिव्यू ग्रुप (आयसीआरजी) च्या बैठकीत शुक्रवारी याबाबतचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय  तुर्कीशिवाय एफटीएफमधील अन्य ३९ सदस्य राष्ट्रांनी १३ अ‍ॅक्शन प्लॅनसंदर्भात गांभिर्याने काम करण्याचा इशारा दिला. जूनपर्यंत याची अंमलबजावणी करावी असा अल्टीमेटमही पाकला देण्यात आला आहे. यामध्ये दहशतवादी संघटनेच्या प्रमुखांच्या अटकेचाही समावेश आहे. 

Video: ओवेसींच्या सभेत तरुणीकडून 'पाकिस्तान जिंदाबाद' अशी घोषणाबाजी

एफएटीएफच्या निर्णयापूर्वी तुर्कीचे राष्ट्रपती तयिप इरडोगन आणि मलेशियाचे पंतप्रधान महाथिर बिन मोहम्मद यांनी पाकची बाजू मांडली होती. तुर्कीने पाकला काळ्या यादीतून बाहेर काढण्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली होती. तर मलेशियाने पाकने दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलल्याचे म्हटले होते. पॅरिसमधील बैठकीत  एफएटीएफ सदस्यांनी यावरही भर दिला. एफएटीएफच्या तांत्रिक प्रक्रियेमध्ये राजकारण आणू नये, असेही पाकला सुनावण्यात आले.  

...तर 'तुम्ही' सगळेच भस्मसात व्हाल; मनसेचा वारिस पठाणांना इशारा

पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून बाहेर पडून व्हॉईट लिस्टमध्ये येण्यासाठी ३९ पैकी १२ मतांची आवश्यकता आहे. काळ्या यादीत नाव जाण्यापासून वाचण्यासाठी किमान तीन सदस्य त्यांच्या बाजूने असायला हवेत. मागील महिन्यात बीजिंगमध्ये  एफएटीएफची बैठक झाली होती. यावेळी त्यांना तुर्की, चीन आणि मलेशियाकडून समर्थन मिळाले होते.