पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

परवेझ मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा रद्द

परवेझ मुशर्रफ

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. लाहोरच्या उच्च न्यायालयाने परवेझ मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा रद्द केली आहे. देशद्रोहाच्या प्रकरणामध्ये विशेष न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. याप्रकरणी परवेझ मुशर्रफ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज या प्रकरणावर सुनावणी करत असताना उच्च न्यायालयाने त्यांची फाशीची शिक्षा रद्द केली आहे.

'आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसमोर उभं राहण्याची मोदींमध्ये हिंमत नाही'

मुशर्रफ यांच्याविरोधात २०१३ मध्ये पाकिस्तानातील विशेष न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. पाकिस्तानच्या घटनेतील कलमांचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. नोव्हेंबर २००७ मध्ये देशात आणीबाणी लागू करताना आणि तेथील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना अटक करताना त्यांनी घटनेतील तरतुदींची पायमल्ली केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. याप्रकरणी १७ डिसेंबर रोजी सुनावणी करताना विशेष न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. पाकिस्तानमध्ये माजी लष्करप्रमुखांना फाशीची शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच घटना होती.  

'मोदी आणि आदित्यनाथ यांच्याविरोधात घोषणा देणाऱ्यांना जिवंत गाडू'