पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अपाचे आणि राफेलमुळे पाकिस्तान घाबरला; चीनकडे मागितली मदत

पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात अपाचेची ८ लढाऊ विमान दाखल झाल्यानंतर आता राफेल लढाऊ विमान देखील दाखल झाले आहे. त्यामुळे भारतीय हवाई दलाची ताकद वाढली आहे. अपाचे आणि राफेल विमानामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह ज्यावेळी राफेल विमानातून प्रवास करत होते. त्यावेळी चीन दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरुन चीनकडे मदतीची मागणी करत होते. यावेळी त्यांच्यासोबत पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा देखील उपस्थित होते. 

पाठीत वार करणाऱ्यांचा कोथळा बाहेर काढू, उद्धव ठाकरेंचा सूचक इशारा

पाकिस्तानचे लष्कर प्रमुख बाजवा यांनी मंगळवारी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंगळवारी भेट घेतली. पीएलए मुख्यालयात जाऊन त्यांनी कमांडर आर्मी जनरल आणि केंद्रीय सैन्य आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. महत्वाचे म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान आणि लष्कर प्रमुख बाजवा दोघेही वेगवेगळ्या वेळी बिजींग येथे दाखल झाले. पहिले बाजवा चीनमध्ये पोहचले त्यानंतर इम्रान खान पोहचले. इमरान खान एकदा नाही तर तिसऱ्यांदा चीनचा दौरा करत आहेत. इम्रान खान यांनी यावेळी चीनचे प्रतप्रधान ली केकियांग यांची भेट घेतली. 

...तर पवाराची औलाद सांगणार नाही: अजित पवार

दरम्यान, भारत सरकराने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यामुळे पाकिस्तान संतप्त झाला आहे. कलम ३७० रद्द केल्यामुळे दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. अशामध्ये भारतीय सैन्य दलाच्या ताकदीमध्ये आणखी वाढ झाली आहे. भारतीय वायुदलाच्या ताफ्यात ३ सप्टेंबर रोजी ८ अपाचे लढाऊ विमान दाखल झाले. तर ८ ऑक्टोबर रोजी वायुसेना दिनी भारतीय वायु दलाला पहिले राफेल विमान मिळाले. त्यामुळे पाकिस्तानच्या मनात सुरक्षेबाबत भिती निर्माण झाली आहे. 

ऐतिहासिक दिवस, पहिले राफेल विमान भारतीय हवाई दलाकडे