पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हेरगिरी प्रकरणी नौदलाच्या ११ कर्मचाऱ्यांना अटक

भारतीय नौदल

पाकिस्तानी हेरगिरी रॅकेटशी संबंध असल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत ११ नौदलाच्या जवानांसह १३ जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांनी सोशल मीडियावर हनी ट्रॅपच्यामाध्यमातून आपल्या जाळ्यात अडकवले होते. 

भगवान रामही भाजपची मदत करु शकले नाहीत, संजय राऊत यांचा टोला

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) एएनआय या  वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मुंबई, कारवार आणि विशाखापट्टणमसह देशातील अनेक नौदल तळांवरुन त्यांना अटक केली आहे. या सर्वांवर फेसबुकसह त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलद्वारे भारतीय नौदलाची संवेदनशील माहिती लीक केल्याचा आरोप आहे.

कोरोनापुढे चीन सरकार हतबल, आतापर्यंत १,७६५ नागरिकांचा मृत्यू

नौदल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या नौदलातील जवानांच्या सोशल मीडिया प्रोफाइलची तपासणी केली जात आहे आणि संशयित आरोपी कोण आहेत याचा शोध सुरू आहे. आंध्रप्रदेश पोलिस, नौदलाची गुप्तचर यंत्रणा आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणा यांनी संयुक्तरित्या ही कारवाई सुरु केली होती. ज्यावेळी डिसेंबर महिन्यात हेरगिरी प्रकरणात सहभागी असलेल्या सात नौदल कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. 

लासलगाव प्रकरण: मुख्य आरोपीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, याप्रकरणाचा तपास करणाऱ्या आंध्रप्रदेश पोलिसांना नौदलाची गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे सहकार्य करत आहे. नौदलाच्या कर्माचाऱ्यांद्वारे सोशल मीडियाचा दुरुपयोग केल्याच्या घटना समोर आल्यानंतर भारतीय नौदलाने आपल्या कर्मचाऱ्यांना फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा आणि स्मार्टफोनचा वापर करण्यास बंदी घातली आहे. तसंच, याप्रकारची बंदी भारतीय लष्कर आणि वायूदालाने देखील घातली आहे. 

यवतमाळमध्ये भीषण अपघात; ७ ठार, १५ जखमी