पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकमध्ये महागाई शिगेलाः दूध १२० रुपये लिटर तर मटन ११०० रुपये किलो

इम्रान खान

भारताचा शेजारील देश पाकिस्तानला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. तेथील सामान्य नागरिकांना फळं, भाज्या आणि दूध घेणेही आवाक्याबाहेर गेले आहे. पाकिस्तानचे चलन डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या सर्वांत निचांकी स्तरावर आले आहे. त्यामुळे एक डझन संत्री ३६० रुपये तर लिंबू आणि सफरचंद हे ४०० रुपये किलोने विकले जात आहेत. 

पाकिस्तानच्या उमर कुरेशी नावाच्या व्यक्तीने फळं आणि भाज्यांच्या किमती टि्वट केल्या आहेत. कुरेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये फळं, भाज्या खाणं सामान्य लोकांच्या आवाक्यात राहिलेले नाही. संत्री ३६० रुपये डझन, केळी १५० रुपये डझन, लिंबू आणि सफरचंद हे ४०० रुपये किलोने विकली जात आहेत. तर मटन आणि चिकनचे दर हे किलोमागे अनुक्रमे ११०० आणि ३२० रुपयांपर्यंत गेले आहेत. एका लिटर दुधासाठी १२० रुपये द्यावे लागत आहेत. 

भारतात भाजपसह अनेक राजकीय पक्षांनी कुरेशींचे टि्वट रिटि्वीट केले आहे. मागील आठवड्यातच पाक सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीबरोबर (आयएमएफ) सहा अब्ज डॉलरच्या मदतीबाबत सकारात्मक बोलणी केली आहे. या बोलणीनंतर चार दिवसातच पाकिस्तानी अर्थव्यवस्था डगमगल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत १४८ रुपयांवर पोहोचला होता.

LOC वरील तणाव कमी करण्यासंदर्भात पाकचा भारताकडे प्रस्ताव

पाकिस्तानी केंद्रीय बँकेने दिलेल्या माहितीनुसार, डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयात झालेली घसरण ही मागील ५ महिन्यातील सर्वाधिक आहे. मागील वर्षी पाकच्या चलनात सुमारे २० टक्के घसरण झाली होती. पाकिस्तानी चलन आशियातील १३ चलनांपैकी सर्वाधिक खराब कामगिरी करणारे चलन ठरले आहे. 

चलनाचे अवमूल्यन रोखण्यासाठी इम्रान खान सरकार पाकिस्तानी नागरिकांना विदेश प्रवासात नेण्यात येणाऱ्या चलनाची सध्याची १० हजार डॉलरची मर्यादा ३ हजार डॉलरपर्यंत आणण्याचा विचार करत आहे. त्याचबरोबर ज्या कंपन्या चढ्या दराने डॉलरची विक्री करत आहेत, त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेशही सरकारने दिले आहेत.

काश्मीरमध्ये अतिदक्षतेचा इशारा, हवाई तळांवर दहशतवादी हल्ल्यांची शक्यता

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Pakistan economy worsen oranges 30 rupee piece milk 120 rupee Litre mutton of Rs 1100 per kg