पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'ना'पाक डाव; ४५० दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत

पीओकेमधील १४ लॉचिंग पॅडवर त्यांनी दहशतवाद्यांची संख्या दुप्पट केली आहे. हे दहशतवादी भारतात घुसण्याच्

संपूर्ण जगासह पाकिस्तानही कोरोना विषाणूशी झगडत आहे. तिथेही लॉकडाऊनही सुरु आहे. परंतु, यादरम्यान त्यांनी दहशतवाद्यांची फॅक्टरीच्या कामकाजालाही वेग दिला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हिंदुस्थान टाइम्सला सांगितले की, पीओकेमधील १४ लाँचिंग पॅडवर त्यांनी दहशतवाद्यांची संख्या दुप्पट केली आहे. हे दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत आहेत. 

३ मे नंतरही लॉकडाऊन?, अनेक राज्ये कालावधी वाढण्यास तयार

अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार पाकसमर्थक वेगवेगळ्या दहशतवादी समूहांकडे सुमारे ४५० दहशतवादी या लाँचिंग पॅडवर उपस्थित आहेत. पाकिस्तानमध्ये रविवारपर्यंत १२७००हून अधिक कोरोना संक्रमित रुग्ण आहेत. तर २६८ लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु, अशावेळी आपल्या देशातील लोकांना या आजारातून बाहेर काढण्याऐवजी भारतात दहशतवादी पाठवण्यावर पाकचा भर असल्याचे दिसत आहे. 

धीरज आणि कपिल वाधवान सीबीआयच्या ताब्यात: गृहमंत्री

२-३ आठवड्यात वाढले दहशतवादी

दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा योजना तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी गुप्तचर यंत्रणांनाकडून जी माहिती मिळाली, त्यानुसार पाकिस्तानने लाँचिंग पॅड्सवर दहशतवाद्यांची संख्या दुप्पट केली आहे. ९ एप्रिलला हिंदुस्थान टाइम्सने लाँचिंग पॅड्सवर २३० दहशतवादी असल्याचे वृत्त दिले होते. गेल्या २-३ आठवड्यात तेथील स्थिती बदलल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. 

संकटाच्या काळातही काही जणांकडून राजकारण, CM ठाकरेंची टीका

४५० दहशतवाद्यांपैकी २४४ लष्कर-ए-तोयबाचे आहेत, १२९ जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी, ६० हिज्बुल मुजाहिदीन आणि उर्वरित अल बदरसारख्या छोट्या संघटनांचे आहेत. यातील बहुतांश दहशतवाद्यांनी नुकताच पाकिस्तानमधील शिबिरात प्रशिक्षण घेतले आहे.