पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना : पाकिस्तानने इस्लामाबादसह अनेक प्रांतात केले सैन्य तैनात

पाकिस्तान देशाचा झेंडा

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात भितीचे वातावरण आहे. या विषाणूमुळे जगभरात मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पाकिस्तानमध्ये सुद्धा कोरोना विषाणूचा वेगाने प्रादुर्भाव होत आहे. या गंभीर परिस्थितीत कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी पाकिस्तान सरकारने देशभरात सैन्य तैन्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने राजधानी इस्लामाबादसह पंजाब, सिंध, खैबर-पख्तूनख्वाह, बलुचिस्तान , गिलगिट आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमध्ये सैन्य तैनात केले आहे.

टाळ्या, थाळ्या वाजवून कोरोना जाणार नाही : मुख्यमंत्री

कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या इराण आणि चीन या देशांच्या सीमा पाकिस्तानला लागून आहेत. पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूने कहर केला आहे. या विषाणूने पाकिस्तानमध्ये ५ नागरिकांचा बळी घेतला आहे. तर ८०० नागरिकांना या विषाणूची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गिलगिल प्रांतामध्ये एका २६ वर्षीय डॉक्टरचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला. उसामा रियाज असे या डॉक्टरचे नाव आहे.

टॅक्सी-रिक्षाला परवानगी मिळेल, पण...

कोरोनामुळे मृत्यू झालेले डॉक्टर उसामा रियाज हे इराण आणि इराकमधून आलेल्या कोरोनाबाधितांवर उपचार करत होते. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळेच डॉक्टर उसामा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी डॉक्टर उसामा रियाज घरी आले होते. मात्र दुसऱ्या दिवशी ते घरी आले नाही. सुरुवातीला त्यांना सैन्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर जिल्हा रुग्णालयात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. उपचारा दरम्यान रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:pakistan deploys troops of pakistan army to deal with corona virus spread in islamabad and other provinces