पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींच्या विमानाला हवाई हद्द वापरण्यास पाकची मनाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo ANI)

भारताने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यामुळे पाकिस्तानचा जळफळाट अजूनही सुरुच आहे. आधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या विमानाला हवाई हद्द वापरण्यास नकार दिल्यानंतर आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानालाही आपल्या हवाई हद्दीतून जाण्यास मनाई केली आहे. काश्मीर मुद्द्यावरुन एकटा पडलेल्या पाकने आता दुष्प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. 

ममता बॅनर्जींनी घेतली मोदींची भेट, 'या' मुद्द्यांवर केली चर्चा

भारताला याची माहिती दिल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सांगितले. आपण स्वतः पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तांना याची माहिती दिल्याचे ते म्हणाले. 

पंतप्रधान मोदी हे संयुक्त राष्ट्र संमेलनात भाग घेण्यासाठी २१ सप्टेंबर रोजी भारतातून अमेरिकेला रवाना होणार आहेत. तत्पूर्वी पाकने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आईसलँडला जाण्यासाठी पाकिस्तानी हवाई हद्द वापरण्याची परवानगी नाकारली होती. तेव्हाही शाह महमूद कुरेशींनी परवानगी दिली नसल्याचे सांगितले होते. त्यावेळी राष्ट्रपती कोविंद हे आईसलँड, स्वित्झर्लंड आणि स्लोवेनियाच्या दौऱ्यावर गेले होते.

भारतात दहशतवादी चंद्रावरुन येत नाहीत, युरोपीय महासंघानं पाकला सुनावलं