पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिथरलेल्या पाककडून कराची हद्दीतील तीन हवाई मार्ग बंद

पाकच्या हद्दीतील तीन मार्ग बंद

पाकिस्तानने कराची हवाई हद्दीतील मार्ग २८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट तीन दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागर विमानन प्राधिकरण बुधवारी यासंदर्भातील घोषणा केली. यापूर्वी पाकिस्तान सरकारकडून भारतासाठी हवाई हद्द बंद करण्याचा विचार सुरु असल्याचे वृत्त समोर आले होते. 

भारत-पाक तणावाच्या परिस्थितीत आफ्रिदी LOC दौरा करणार

या निर्णयामुळे पाकिस्तानमधील कराची हद्दीतील तीन हवाई मार्गावर परिणाम होणार आहे. प्राधिकरणाच्या प्रसिद्धी पत्रानुसार १ सप्टेंबरपासून सेवा पूर्ववत सुरु होईल.  पाकचे मंत्री फवाद चौधरी यांनी मंगळवारी एका ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान इम्रान खान भारतासाठी हवाई हद्द बंद करण्याबाबत विचार करत आहेत, असे सांगितले होते. पाकिस्तान मंत्रिमंडळाने भारतासाठी हवाई हद्द बंद करण्याबाबहत चर्चा झाली होती. भारत-अफगाणिस्तान व्यापार मार्गात अडथळा निर्माण करण्यासंदर्भात पाकने नवा डाव रचला होता. 

'भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल त्यांना आयुष्यभराची अद्दल घडवू'

यापूर्वी भारताकडून बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या सर्जिकल स्टाईकनंतर पाकने विमान हद्द बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी नवी दिल्ली, बँकाक आणि क्वालालंपूर व्यतिरिक्त सर्व उड्डाणावर याचा परिणाम झाला. १६ जूलै रोजी पाककडून विमान हद्दीचे निर्बंध उठवण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा पाककडून हवाई बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.