पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुलवामा हल्ल्यानंतर 'जैश'च्या दहशतवाद्यांचा दिल्लीवर होता निशाणा

पुलवामा हल्ल्यावेळचे दृश्य (PTI)

पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा कार हल्ल्यानंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये हल्ल्याची तयारी केली होती. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) माहितीनुसार, जैशच्या एका टोळीने दिल्लीत यासाठी रेकीही ही केली होती.

दिल्लीतील एनआयए न्यायालयात १६ सप्टेंबरला जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी सज्जाद अहमद खान, तन्वीर अहमद गेनिए, बिलाल अहमद मीर आणि मुझफ्फर अहमद भट्ट यांच्याविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात याचा दावा करण्यात आला आहे.

नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच घुसखोरः काँग्रेस

सज्जाद अहमद खानला जुन्या दिल्लीतून मार्चमध्ये अटक करण्यात आली होती. त्याने महत्त्वाच्या सरकार जागा, यामध्ये साऊथ ब्लॉक आणि केंद्रीय सचिवालय आणि दिल्लीतील सिव्हिल लाईन्स, बीके दत्त कॉलनी, काश्मिरी गेट, लोधी इस्टेट, मंडी हाऊस, दरियागंज आणि गाझियाबादची रेकी केली होती. खानच्या अटेकनंतर तीन इतर जणांना पकडण्यात आले होते.

आरोपपत्रानुसार हे चारही संशयित सातत्याने मुदास्सिर अहमदच्या संपर्कात होते. मुदास्सिर पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. त्याच जम्मू-काश्मीरमधील त्राल येथे १० मार्च रोजी झालेल्या चकमकीत खात्मा झाला होता.

फडणवीसांना सत्तेसाठी अति घाई आणि फाजील आत्मविश्वास नडला