पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाक नरमले! भारतातून औषधी वस्तूंच्या आयातीला मंजुरी

इम्रान खान

जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर नाराजी व्यक्त करण्यासाठी भारतासोबतच्या द्विपक्षीय संबंध तोडण्याची भाषा करणारे पाकिस्तान महिन्याभरात ताळ्यावर आले आहे. भारतातून औषधी वस्तू आयातीला पाकिस्तानने मंजुरी दिली.  

J&K : सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांना विमा संरक्षणाचे आश्वासन

सोमवारी पाकिस्तानी वाणिज्य मंत्रालयाने याला मंजुरी देण्यात आली आहे. यासंदर्भात पाकिस्तानने वैधिनिक नियामक आदेश  (statutory regulatory order) देखील जारी करण्यात आला आहे. केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा बहाल करणारे कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच तिडपापड झाला.

बिथरलेल्या पाककडून कराची हद्दीतील तीन हवाई मार्ग बंद

भारताच्या अंतर्गत मुद्यांवर हस्तक्षेप करत पाकने दोन्ही देशांतील व्यापार संबंध तोडण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आपल्या उच्चायुक्तांना भारतात पाठवण्यापासून रोखणे तसेच भारताच्या उच्चायुक्तांना पाकिस्तान सोडण्यास सांगितले होते.