पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तान नव्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यासाठी सज्ज

इम्रान खान

काश्मिरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण झालेले असतानाच आता पाकिस्तानकडून आज, गुरुवारी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती मिळते आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अण्वस्त्र युद्धाची शक्यता वर्तविली होती. न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही शक्यता वर्तविली होती. त्या पार्श्वभूमीवर आज घेतल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्र चाचणीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

बिथरलेल्या पाककडून कराची हद्दीतील तीन हवाई मार्ग बंद

२६ ऑगस्ट रोजी पाकिस्तानकडून या चाचणीबद्दल भारताला माहिती देण्यात आली. बलुचिस्तानमध्ये ही चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. भारत आणि पाकिस्तानमध्ये २००५ मध्ये झालेल्या करारानुसार कोणताही देश क्षेपणास्त्राची चाचणी घेणार असेल, तर त्याची पूर्वकल्पना दुसऱ्या देशाला किमान ३ दिवस आधी देईल, असे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार पाकिस्तानने क्षेपणास्त्र चाचणीची माहिती भारताला दिली आहे.

क्षेपणास्त्र विषयातील तज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी पाकिस्तान घेणार आहे. गझनवी असे या क्षेपणास्त्राचे नाव असणार असून, ३०० किलोमीटरवरील लक्ष्य भेदण्याची ताकद या क्षेपणास्त्रामध्ये आहे. बलूचिस्तानमधील चाचणी तळावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात येईल. पाकिस्तानमधील नॅशनल डेव्हलपमेंट कॉम्प्लेक्सकडून त्याचे निरीक्षण केले जाईल.

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात अटक वॉरंट

दरम्यान, या क्षेपणास्त्र चाचणीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून कराचीमधील हवाई हद्द २८ ते ३१ ऑगस्ट या कालावधीसाठी बंद करण्यात आली आहे.