पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तानमध्ये अकबर एक्स्प्रेसला अपघात; १० ठार तर ६४ जखमी

pakistan train accident

पाकिस्तानमध्ये दोन रेल्वेची समोरा समोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ६४ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहे. पाकिस्तानच्या पूर्व पंजाबमध्ये ही घटना घडली आहे. एक्स्प्रेस आणि मालगाडीमध्ये जोरदार टक्कर होऊन भीषण अपघात झाला आहे. 

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा; वैद्यकीय प्रवेशात 

सादिकबाद येथील वल्हार रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगामध्ये असलेली अकबर एक्स्प्रेस वल्हार रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीला जाऊन धडकली. हा अपघात ऐवढा भीषण होता की त्यामध्ये एक्स्प्रेसचे सर्व डबे रुळावरुन घसरले. या अपघातामध्ये एक्स्प्रेसचे इंजिन आणि तीन डब्याचे मोठे नुकसान झाले आहे. 

धोनीजी, निवृत्त होऊ नका! लतादीदींची भावनिक साद

अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. अपघातग्रस्त रेल्वेमध्ये अडकलेल्या जखमींना सुरक्षितरित्या बाहेर काढून तात्काळ रुग्णालयात हलवण्यात येत आहे. जखमींना सादिकाबाद आणि रहीम यार खान येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बचावाकार्य अद्यापही सुरु आहे. हायड्रॉलिक कटरच्या सहाय्याने रेल्वेमधून मृतदेहांना बाहेर काढण्यात येत आहे. 

...तर सचिन-रोहितचा विक्रम मागे टाकणे वॉर्नरला जमणार नाही

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी या अपघात प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तर रेल्वे मंत्रालयाने अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना१५ लाख आणि जखमींना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि रेल्वे मंत्री यांनी या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. रेल्वे मंत्री शेख रशीद अहमद यांनी रेल्वे अपघातातील सर्व जखमींना तात्काळ मदत करण्यात यावे असे आदेश दिले आहेत.