पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकमध्ये गव्हाचे पीठ ७० तर साखर ७४ रुपये किलो, महागाई गगनाला भिडली

पाकिस्तानमध्ये ७० रुपये किलो गव्हाचे पीठ, साखरेचा दर ७४ रुपयांवर

सामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्याचे वचन देऊन सत्तेवर आलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची झोप सध्या उडाली आहे. पाकमध्ये गव्हाच्या पीठाच्या मोठ्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यातच आता साखरेची किंमत गगनाला भिडत आहेत. दैनंदिन जीवनात अत्यंत गरजेचे असलेले पीठ आणि साखरेच्या वाढलेल्या दरांमुळे आता इमरान खान यांना हस्तक्षेप करावा लागला आहे. गव्हाचे पीठ आणि साखरेच्या वाढत्या किमतीला जबाबदार असणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. 

मुलगा-मुलीचा खून करुन मेट्रोसमोर उडी घेऊन एकाची आत्महत्या

इमरान खान यांनी टि्वट करुन म्हटले की, जनतेचा त्रास मी समजू शकतो. मंगळवारी कॅबिनेटच्या बैठकीत खाद्य पदार्थांच्या किंमती कमी करण्यासठी पावले उचलली जातील. सरकारी संस्थांनी गव्हाचे पीठ आणि साखरेच्या किंमतींची चौकशी करणे सुरु केले आहे. मी देशाला आश्वासन देतो की, जे लोक यासाठी जबाबदार असतील, त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल. त्यांना शिक्षा दिली जाईल. 

दरम्यान, पाकिस्तानमध्ये गव्हाच्या पीठाच्या टंचाईमुळे एका रोटीची किंमत १२ ते १५ रुपये झाली आहे. इमरान खान सरकारच्या १५ महिन्यांच्या कार्यकाळात साखरेची घाऊक किंमत आता ७४ रुपये किलो झाली आहे. देशात साखरेचे दर सातत्याने वाढताना दिसत आहेत. तज्ज्ञांच्या मते ही किंमत ८० रुपये प्रति किलोपर्यंत जाईल. 

आम्हाला हिंदुत्व सिद्ध करायची गरज नाही: उद्धव ठाकरे

साखरेच्या किंमती वाढल्या असल्या तरी इमरान खान सरकारने आतापर्यंत निर्यातीवर बंदी घातलेली नाही. निर्यातीवर प्रतिबंध घातले नाहीतर साखरेचे दर १०० रुपये प्रति किलो जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी परवेज मुशर्रफ यांच्या कार्यकाळात साखरेचे दर १०५ रुपये पर्यंत पोहोचले होते.