पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तानचं शेपूट वाकडंच, २००० हून अधिक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन

भारतीय लष्कर (संग्रहित छायाचित्र)

वारंवार भारतीय सैन्यदलाकडून चोख प्रत्युत्तर मिळूनही पाकिस्तान आपल्या कृत्यांपासून बोध घेताना दिसत नाही. यावर्षी पाकिस्तानने चिथावणी दिली नसतानाही २०५० पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पाकिस्तानच्या या कृत्याबाबत गंभीर असल्याचे म्हटले आहे. 

रोजगार भरपूर पण उत्तर भारतीयांमध्ये 'क्वॉलिटी'ची कमतरता: केंद्रीय मंत्री

रवीश कुमार यांनी म्हटले की, आम्ही सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीबाबत गंभीर आहोत. पाकिस्तानी सैनिक भारतीय नागरिक आणि बॉर्डर पोस्टला लक्ष्य करत आहेत. पाकिस्तानच्या या कृत्यामुळे वर्षभरांत २१ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

प्रत्येकवेळी आम्ही पाकिस्तानी सैन्याला शांतता राखण्याचे आवाहन करतो. पण त्यांना हे समजत नाही. भारतीय सैन्य सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्याचा प्रयत्न करते आणि शस्त्रसंधीला चोख प्रत्युत्तरही दिले जाते, असेही ते म्हणाले.

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा, ट्रम्प यांचा दुजोरा

शनिवारीही पाकने जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील केम मंजाकोटमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यानंतर ५ किमीच्या अंतरात असलेल्या शाळा बंद करण्यात आल्या. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील गावांवर आणि चौक्यांवर पाकिस्तानी सैनिकांनी मोर्टारचा हल्ला केला. तसेच बेछुट गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघनही केले.