पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कुलभूषण जाधव यांच्यासाठी पाकिस्तानकडून लष्करी कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय

कुलभूषण जाधव

पाकिस्तानमधील कैदेत असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना तेथील नागरी न्यायालयात आपल्या शिक्षेविरोधात याचिका दाखल करता यावी, यासाठी पाकिस्तान सरकारने आपल्या लष्करी कायद्यामध्ये सुधारणा करण्याच्या निर्णय घेतला आहे. एएनआयने या संदर्भातील वृत्त दिले आहे. 

मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीसांची नवी ओळख महाराष्ट्राचा सेवक

पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. याविरोधात भारताकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना शिक्षेविरोधात नागरी न्यायालयात याचिका दाखल करता आली पाहिजे, असे निर्देश पाकिस्तान सरकारला दिले होते. त्यासाठीच आता पाकिस्तान सरकारने आपल्या लष्करी कायद्यामध्ये यासाठी आवश्यक ते बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रेयसीच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या प्रियकराकडून तिचाच खून

पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर त्याविरोधात नागरी न्यायालयात आव्हान द्यायला कुलभूषण जाधव यांना तेथील सरकारने नकार दिला होता. त्याचबरोबर कुलभूषण जाधव यांना दूतावास पातळीवरील मदत (कौन्सिलर अॅक्सेस) देण्यासही पाकिस्तानने नकार दिला होता. भारताने या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरील निकालावेळी न्यायालयाने पाकिस्तानला खडे बोल सुनावले होते आणि कुलभूषण जाधव यांना दूतावास पातळीवरील मदत देण्यास सांगितले होते.